महाबळेश्वर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.१०.१८
बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या महिला शहराध्यक्ष पदी अनिता गौतम मोरे तर उपाध्यक्ष पदी सिंधू वने यांची निवड करण्यात आली.युवती तालुका अध्यक्षपदी श्वेता शांताराम मोरे,उपाध्यक्षपदी दिपाली राजेंद्र कांबळे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांच्या उपस्थितीत महिला प्रदेशाध्यक्षा माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे यांनी घोषित केली.सदर निवडी बद्दल किरण शिंदे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.याप्रसंगी अनिता मोरे,सिंधू वने,श्वेता मोरे,दिपाली कांबळे,रेश्मा कांबळे,शाहीन पन्हाळकर,अरुणा काकडे,भारती मोरे,संगीता कांबळे,रंजना कांबळे,अंजना कसबे,जयश्री वाघमारे,वंदना मोरे,सुजाता मोरे,कविता मोरे,आशा भालेराव,नंदा मोरे,सुनंदा रोकडे तालुकाध्यक्ष सुमित कांबळे,जिल्हाध्यक्ष प्रशांत मोरे,युवक अध्यक्ष अनिकेत मोरे,उपाध्यक्ष पंकज कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



















