पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०९.२०१९
पुणे- जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुण्यातील अरण्येश्वर परिसरामध्ये आतापर्यंत ११ मृत जनावरांचे देह सापडल्याचे वृत्त आहे.गेल्या तीन दिवसांपासुन पुणे व परिसरामध्ये संततधार पाऊस चालु होता त्यामुळे पुण्यातील अरण्येश्वर,के के मार्केट व आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता.आज या परिसरामध्ये शाळा व कॉलेजेसला सुट्टी घोषित करण्यात आली आहे.दरम्यान या परिसरामध्ये अजूनही पाणी असून सदर परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.तसेच या ठिकाणी प्रशासन,पोलीस व स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने मदतकार्य चालू आहे.परिसराची स्वच्छता करण्याचे कार्य पालिकेमार्फत चालू आहे.आतापर्यंत या ठिकाणी ११ जनावरांचे मृतदेह सापडले आहेत.तसेच एक चारचाकी गाडी पुलाच्या खाली अडकून पडलेली आहे.



















