चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०६.१९
सावली- तालुक्यातील व्याहाड केरोडा मार्गावर असलेल्या निमडोंगरी परिसरातून वीना परवानगी मुरुमाची अवैद्य वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती नायब तहसीलदार चिडे यांना मिळाली. माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता परिसरातिल तलाठी सोबत घेऊन धाड मारली असता मुरुम भरलेल्या वाहनाकडे मुरुमाचा परवाना दिसून आला नाही. त्यामुळे नायब तहसिलदार चिडे यांनी दोन वाहनांवर दंड ठोठावुन कारवाही केली.
सावली तालुक्यातील व्याहाड – केरोडा मार्गावर में.पियुष इंफ्राटेक औरगाबाद , कंपनीचे गट क्रमांक १६५ निमडोंगरी परिसरात मुरुम उत्खणाचे लाखोंचे काम सुरु आहे. या कंपनीने आसोलामेंढा उजवा कालव्याचे नुतनिकरणाचे काम सूरु केले आहे. दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. सतत काम सुरु आहे. आतापर्यंत ५०० ब्रास चे मुरुम उत्खनन झाले आहे.
या कामात मोठे ७ हायवा ट्रक सुरु आहेत.सुरु असलेल्या वाहनाजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नाही. नायब तहसिलदार चिडे यांनी वाहनाची तपासणी केली असता कोणत्याही प्रकारचा परवाना(T.P) दिसून आला नाही.त्यामुळे नायब तहसिलदारांनी वाहन तहसिल परिसरात लावुन नियमानुसार दंड ४लाख ५४ हजार रूपयाचा दंड ठोटावुन कारवाही केली. या कारवाईने परिसरातील अवैद्य व्यावसायीकांचे धाबे दणानले आहे.



















