उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३.११.१९
कळंब- शहरात पोलीस उपाधिक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २९ जीप व रिक्षा चालकांवर ही कार्यवाही करण्यात आली असून आतापर्यंतच्या माहितीनुसार ५८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. कळंब ढोकी रोड, कळंब येरमाळा रोड, कळंब परळी रोड वर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २९ वाहनचालकांवर कळंब पोलिसांनी कारवाई केली आहे या वाहतुकीमुळे तीन आसनी रिक्षा चालकांना फटका बसला असून सुमारे २९ वाहने ताब्यात घेतल्याची माहिती कळंब पोलिसांनी दिली त्यामुळे कळंब पोलीस स्टेशन आवारात जप्त केलेल्या वाहनांची रांग लागली होती. छत्रपती शिवाजी चौक, होळकर चौक, बस स्थानक या टप्प्यात मोठ्या प्रमाणात तीन चाकी रिक्षा जीप ही वाहने प्रवासी वाहतूक करतात एका वाहनात पाच प्रवासी बसण्याची परवानगी असताना या बेकायदा वाहतूकदारांनी दहा प्रवासी बसविण्याची प्रथा सुरू केली आहे या बेकायदा वाहतुकीमुळे तीन आसनी रिक्षांना प्रवासासाठी प्रवासी मिळणासे झाले आहेत. पोलिसांनी कळंब ढोकी रोड, कळंब परळी रोड, कळंब येरमाळा रोड, दरम्यान ही बेकायदा वाहने जप्त केली ही कारवाई पो.ना. पठाण एफ .एच. व पो.काॅ. एस.बी.शेवाळे यांनी केली.



















