सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१७.११.१९
खंडाळा- तालुक्यांतील मरिआईचीवाडी येथे बेकायदेशीरपणे वाळूसाठा केल्या प्रकरणी विक्रम शामगाव धायगुडे रा.पिंपरे बुद्रुक ता.खंडाळा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच बेकायदेशीरपणे केलेल्या वाळू साठा देखील महसूल विभागाने जप्त केला आहे. अधिक माहिती अशी मरीआईचीवाडी गावच्या हद्दीत गट नंबर १८९ मधे विक्रम शामराव धायगुडे यांनी विक्रीसाठी बेकायदेशीरपणे वाळूचा साठा केल्याची माहिती तहसीलदार दशरथ काळे यांना सर्कल विजयकुमार व तलाठी किशोर खटावकर यांनी दिली. त्यानंतर शनिवारी रात्री महसूल विभागाने छापा टाकला असता ६०हजार रु.किंमतीची १२ ब्रास वाळू आढळून आली. महसूल विभागाने वाळूचा पंचमामा करुन ही सर्व वाळू खाजगी वाहनाने लोंणद येथील शासकीय गोदाम परिसरात आणून ठेवली आहे. याप्रकरणी विक्रम धायगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















