नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.१४.१०.१९
नाशिक- जिल्ह्यात वचिंत बहुजन आघाडी उमेदवार देण्यात सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असुन पंधरा पैकी अकरा उमेदवार पक्षाने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात वचिंतचे अकरा, काॅगेस पक्षाने सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, शिवसेना दहा, भाजपाचे सहा, मनसे सात जागेवर विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावत आहे. नाशिक पश्चिम विधानसभा माकपच्या डॉ.डी एल कराड यांच्या साठी वंचित बहुजन आघाडीने सोडली असुन नांदगाव येथे सकाळी अकरा तर मनमाड येथे दुपारी एक वाजता तर नाशिक येथे दुपारी दोन वाजता सिटी सेंटर उटवाडी मैदानावर जिल्ह्यातील वंचितचे सर्व उमेदवार व पुरस्कृत माकपच्या डॉ.डी.एल. कराड यांच्या साठी (दि.१५)अँड.प्रकाश आंबेडकर नाशिक मधे जाहीर सभा घेणार असल्याचे माहिती वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख पवनभाऊ पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.नाशिक जिल्ह्यात वचिंत बहुजन आघाडी उमेदवार देण्यात सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असुन पंधरा पैकी अकरा उमेदवार पक्षाने दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात वचिंतचे अकरा, काॅगेस पक्षाने सहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, शिवसेना दहा, भाजपाचे सहा, मनसे सात जागेवर विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावत आहे. नाशिक पश्चिम विधानसभा माकपच्या डॉ.डी एल कराड यांच्या साठी वंचित बहुजन आघाडीने सोडली असुन नांदगाव येथे सकाळी अकरा तर मनमाड येथे दुपारी एक वाजता तर नाशिक येथे दुपारी दोन वाजता सिटी सेंटर उटवाडी मैदानावर जिल्ह्यातील वंचितचे सर्व उमेदवार व पुरस्कृत माकपच्या डॉ.डी.एल. कराड यांच्या साठी (दि.१५)अँड.प्रकाश आंबेडकर नाशिक मधे जाहीर सभा घेणार असल्याचे माहिती वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख पवनभाऊ पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.



















