नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.११.१९
नाशिक- आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाला ठार करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने त्याला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. तातडीने न्याय द्यावा अशी तक्रार भरत प्रभाकर मुर्तडक यांनी निवेदनाद्वारे केली आहे . वाडीवहे येथील भरत मुर्तडक (वय३०) याने गावातील सोनाली (वय २४) हिच्यासोबत मार्च २०१८ मध्ये आंतरजातीय विवाह केला. यानंतर वर्षभर दोघांनी उत्तम संसार केला मात्र हा विवाह आंतरजातीय असल्याने संबंधितांनी जुलै २०१९ मधे नोकरी निमित्त घराबाहेर पडलेल्या सोनालीला गाठून तिला बळजबरीने स्वतःच्या घरी नेले दबाव आणि धाक दाखवून भरत मुर्तडक याला संपवून टाकू असे सांगितल्याने ती दहशतीखाली वावरत आहे .नोंदणीकृत पद्धतीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे राग येऊन भरत मुर्तडक याला रोज गुंडगिरीला सामोरे जावे लागत आहे याबाबत पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, वाडीवहेचे पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत भरत मुर्तडक घोटी येथील एका बँकेत नोकरीला असून त्यानिमित्त रोज प्रवास करताना दहशतीचा सामना करावा लागतो असे निवेदनात म्हटले आहे. पत्नी सोनाली हिला सक्षम अधिकाऱ्यांपुढे हजर करून तिची भूमिका समजून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी योग्य ते पोलिस संरक्षण देऊन न्याय द्यावा अशी मागणी मुर्तडकने निवेदनात केली आहे.



















