आजाद समाज पार्टीचे आंदोलन; संग्रामपूर तहसीलदारांना निवेदन…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि.२७.०७.२०२६
संग्रामपूर – दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ आजाद समाज पार्टी (कांशीराम)च्या वतीने संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. हे आंदोलन प्रदेश सचिव सुजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.



















