चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.४.१०.१९
चंद्रपूर- चिमूर विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपला नामांकन आज हजारो समर्थकांच्या उपस्थिती मध्ये भरला असून या वेळी खासदार अशोक नेते,माजी आमदार मितेश भांगडिया,जि.प.उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष शाम हटवादे,तालुका अध्यक्ष दिलीप शिवरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख धरमशिंह वर्मा,प.स.गटनेता अजहर शेख,महिला आघाडी अध्यक्ष गीताताई लिंगायत,अपर्णाताई भांगडीया,माजी नगराध्यक्ष शिल्पा राचलवार व अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
आ.किर्तीकुमार भांगडीया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. रॅलीदरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीनगरीचे पहिले शहीद बालाजी रायपुरकर यांना अभिवादन केले.या वेळी तालुका भाजपच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.चिमूर,नागभीड,ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित झाले होते.रॅलीत अपर्णाताई भांगडीया यांच्या नेतृत्वात भगव्या वस्त्र परिधान करून मोठ्या संख्यने महिला व युवती समाविष्ठ झाल्या होत्या.चिमूर येथील नेहरू विद्यालयच्या पटागणावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.त्यांनतर यांच स्थळापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रोडशो करण्यात आला.कार्यकर्त्यांकडून आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती.
◆ जनतेचे प्रेम,जिव्हाळा,आपुलकी आणि विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे.महिलांचे हक्क आणि त्यांचे अधिकार या बाबत मी नेहमी आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सिंचन, पिण्याचे पाणी या बाबतच्या समस्या त्या सातत्याने विधानसभेत उपस्थित केल्या. केवळ विकास करणे हेच माझे ध्येय आहे आणि त्या साठी मला परत तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे किर्तीकुमार भांगडीया या वेळी म्हणाले.



















