पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.११.१९
पिंपरी- ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात निघालेल्या मुस्लिम समाजाच्या “जुलूस” या कार्यक्रमात मुस्लिम समाजाला मा.आ.अण्णासाहेब बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा.महापौर संजोगभाऊ वाघेरे पाटील, मा.उपमहापौर महंमदभाई पानसरे, नगरसेवक जावेदभाई शेख मा.आझमभाई पानसरे, सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अकबर मुल्ला, सचिव साहूल उर्फ हमीद शेख, उपाध्यक्ष प्रतिक लोंढे, सहसचिव सादिक शेखजी, जब्बारभाई शेख, चंद्रकांतकाका शिंदे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी फाऊंडेशन तर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुस्लिमांना बांधवांना बिस्किटे व पाणी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन मा.आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशन वतीने करण्यात आले होते.



















