प्रतिनिधी, गोरख सिरसट
केंद्र सरकार च्या वतिने अति मागासवर्गिय दारिद्रय रेषेखालिल व पिवळे रेशन कार्ड धारकांना प्रधानमंत्री योजने अंतर्गत वर्गाला एक सिलेंडर एक शेगडी एक रेग्युलेटर मोफत देण्याची योजना केंद्र सरकारच्या वतिने राबवण्यात येत आहे. पिवळे रेशन कार्ड धारक मागासवर्गिय वर्ग हा झोपडपट्टी भागात रहाणारा असुन तो मोठ्या प्रमाणात अडाणी निरक्षर आहे त्यामुळे काही प्रमाणात का होईना काही गॅस एजन्सी कडुन अडाणी लोकांच्या अडाणी पणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या कडुन पैसे घेऊन त्यांना गॅस शेगडी सिलेंडर रेग्युलेटर वस्तु दिल्या जातिल व त्यांचे फोटो काढुन मोफत वाटप करण्यात आले आहे असे दाखवल्या जाईल त्यामुळे कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कोणत्याही गँस ऐजन्सी ला पैसे देऊ नयेत तसेच ज्या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड व मागासवर्गिय असल्याचा जातिचा दाखला असताना त्याच्या कडुन जर कोणतिही गॅस एजन्सी उज्वला गॅस योजना मध्ये पैसे मागत असेल तर कोणत्याही एजन्सी धारकाला पैसे न देता या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच ही योजना घेण्या करिता जर कोणती गॅस एजन्सी आपल्याकडे पैशाची मागणी करीत असेल तर त्यांची नावे भिम संग्राम सामाजिक संघटनेकडे लेखि तक्रार दाखल करावी त्यांच्या तक्रारीचे निवारन केल्या जाईल तसेच पाञ असताना सुध्दा जर त्या लाभधारकास ति गॅस एजन्सी लाभ देण्यास नकार देत असेल अथवा मोफत योजना देत नसेल तर अशा लोंकानी भिम संग्राम कडे तक्रार दाखल करावी, न्याय मिळवुन दिला जाईल. मदतीसाठी संपर्क साधावा असे आवहान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी केली आहे.



















