सोलापूर (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)
करमाळा, प्रतिनिधी,संतोष पवार
दि.३०,११,१९
करमाळा- शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र व पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन वंदन केले त्यानंतर कुटिर रुग्णालयातील रुग्णांना बिस्किट पुडे व फळे वाटप करण्यात आली. तब्बल विस वर्षानंतर महाशिव आघाडीच्या माध्यमातुन शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले व स्वत:पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिकांच्या आनंदाला भरते आले असुन आवाज कुणाचा शिवसेनेचा, महाशिव आघाडीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार साहेबांचा विजय असो या घोषणांनी व फटाक्यांच्या आताषबाजीने करमाळा शहर दणादणानुन गेले होते. शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे यांच्या कार्यालया समोर मोठ्या संख्येंने शिवसैनिक व महाशिव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी व घोषणा देवुन व एकमेंकाना पेढे भरवुन जल्लोष साजरा करण्यात आला.
या वेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुरावफरतडे, ऋषीकेषचव्हाण, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष महेशकाळे पाटिल, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे नितीनभाऊ झिंजाडे, धनंजय ढेरे, सचिन नलवडे, चंद्रकांत जगदाळे, शिवसेना विभाग प्रमुख अविनाश गाडे, विक्रम कुंभार, बालाजी वाडेकर, भाऊराव मस्तुद, दिंगबर काटुळे शिवाजीराव माने, कालीदास कदम यांच्या सह खडकेवाडी, देवळाली येथील शेतकरी रमेश जगदाळे, मच्छिंद्र जगदाळे, कालीदास जगताप,छगन आवटे, परशुराम करडे, मुरलीधर शेळके,नितिन नलवडे,अजिनाथ माने,धनंजय शेळके बापु शिंदे, विक्रम मगर ,मोतिराम फरतडे, नवनाथ फरतडे,बालाजी फरतडे, जोतिराम घाडगे,कुशाल पारेकर,कृष्णा बोराडे आदी शेतकरी,शिवसैनिक व महाघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी अधिक बोलताना शाहुराव फरतडे म्हणाले की “शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्रातील दिन दलीत,गोरगरीब शेतकरी, महिला, उद्योजक,यांना खऱ्या अर्थाने चांगले दिवस येवुन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.” शिवप्रताप युवा प्रतिष्ठान चे शंभुराजे फरतडे यांनी सर्वांचे स्वागत केले



















