चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०७.१०
चिमुर- तालुक्यातील नेरी जवळील उसेगांव येथील नेरी रोडवरील सार्वजनीक शौचालय येत असलेल्या सततधार पावसामुळे २९ जुलैच्या मध्यरात्री कोसळले. तीन दीवसापासुन येत असलेल्या सततधार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. तर एकीकडे जनजीवन पुर्णपणे वीष्कळीत झालेला आहे. नदी, नाले, बोड्या तुडुंब भरल्या आहेत. उमा नदी ओवरफुल झालेली आहे. काही वर्षापुर्वी सुध्दा अशाच प्रकारे उसेगांव येथील सार्वजनीक शौचालय कोसळले होते. तशाच प्रकारे २९ जुलैच्या मध्यरात्री नेरी रोडवरील सार्वजनीक शौचालय कोसळले आहेत. या शौचालयाचे काम नि निकृष्ट दर्जाचे झाले तर नसावे ? असा प्रश्न उसेगांव वासीयांना पडला आहे. नागरीकांना ऐनवेळेवर सार्वजनीक शौचालय कोसळल्याने शौचास जाण्याची मुसीबत ओढवली आहे .



















