पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.५.१०.१९
पिंपरी- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता राहुल कलाटे आता हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिंचवडमध्ये १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. यात महायुतीचे लक्ष्मण जगताप यांच्यासह बंडखोरी केलेले शिवसेनेचे राहुल कलाटे व महाआघाडीचे प्रशांत शितोळे यांचा समावेश होता. दोघांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले होते. पण आज शितोळे यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.



















