पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२९.१२.१९
देहुरोड- ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड बुध्दविहारात आज साप्ताहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेबांचा आदेश जपत दर रविवारी पुन्हा साप्ताहिक वंदना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी सर्वांनी कुटुंबासमवेत शुभ्र वस्त्र परिधान करून वंदनेस हजर राहवे अशा सूचना सर्वानुमते देण्यात आली. कोणत्याही पक्षाचे राजकीय, अराजकीय, संघटनेचे विचाराचे पायतान काढून सर्वांनी विहारात यायचे आणि बुद्धांनी सांगितलेला धम्म, बाबासाहेबांनी सांगितलेले विचार यावर धम्मप्रवचन व लोकशाहीच्या विचारविनिमय करून सर्वांसाठी विहारात येण्याची आवड व धम्माची गोडी निर्माण व्हावी, यासाठी काही प्रवचनाचे विषय देऊन उपस्थित राहतील त्यांनी तो विषय निवडून त्यावरच बोलायचे, वर्षातील रविवारचे विषय दिले जातील, वर्षातील सर्व पोर्णिमा साजऱ्या करण्यात येतील. विहारात येणाऱ्या सर्वाची नोंद घेवून प्रसार माध्यमातून प्रसिद्धी दिली जाईल. अशा पद्धतीने उपक्रम राबविले जातील
असे अवहान सर्वानुमते करण्यात आले आहे. या वेळी विकास कडलक, सुमेध भोसले,संजय ओव्हाळ, सुनिल कडलक, दादू गायकवाड, अॅड.रुपवते, राजेश्री जाधव, भीमाताई तुळवे, रेखा सुधीर ढोकळे, शारदा ताई गायकवाड, अनुसया अशोक कांबळे, मंदाताई जाधव, मालन ताई पोपट बनसोडे, पोपट खंडोजी बनसोडे, यल्लेश शिवशरण, सुरेश भालेराव, संजय शेंडे, दिपक ताटे, श्रीरंग ओव्हाळ, किशोर कांबळे, काशिनाथ कांबळे, दिपक भालेराव, कुंडलिक खरात, गुलचंद बनसोडे, अरुण बनसोडे, अजय उकरडे, अमर भगत, परकाळे पी एस, सुतकर एम.पी., डी.आर.अमराले, अमर चौरे, किरण शिरसागर, अॅड.गुलाबराव चोपडे, रामचंद्र जगन्नाथ वजदे, सिद्धार्थ रामचंद्र माने, अंकुश कानडी, सविता सागर सोनवणे, प्रकाश सदाशिव ओव्हाळ, सुनील मनोहर तुरकर, गिरीश मोहन वाघमारे, राजा अवतार, राजू गायकवाड, प्रतीक कांबळे, प्रणव तरकसे, आदी उपासक-उपासिका उपस्थित होते.



















