उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.११.१९
कळंब- शहराच्या मध्यभागी डंपिग ग्रांऊड करून शहरामधे जो कचरा जमा होतो तो कचरा दररोज जि.प.शाळेच्या पाठीमागे आणून टाकला जातो त्यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधीने पसरत आहे, त्यामुळे शाळेतील विध्यार्थीसह नागरिकाचे आरोग्य धोक्यात आहे, या कचरा टाकल्यापासून डेंगू,मलेरिया सारख्या रोगाची लक्षणिय वाढ होताना दिसत आहे. हे डंपिग कोनाच्या आदेशाने सुरू केले याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी एमआयएम तालुका अध्यक्ष वाजेद काझी यांनी उप विभागीय अधिकारी यानां निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी युवा तालुका अध्यक्ष सदर मुजम्मिल, मुजावर राजु सय्यद , राहुल हौसलमल, इमरान काझी बंडु (अबा)ताटे, बबलु शिदें उपस्थित होते.



















