सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.२४.०९.१९
करमाळा- तालुक्यातील युवा नेते महेशजी जिजाबराव काळे यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापुर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात अाली आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.सदर निवडी चे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव रमेशजी बारस्कर युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विक्रांतजी माने यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप साठे,राष्ट्रवादीचे सोशल मीडिया सेलचे नितीनभाऊ झिंजाडे व युवा नेते सचिन नलवडे,चंद्रकांत जगदाळे उपस्थित होते.



















