सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, संतोष पवार
दि.०२.०८.१९
करमाळा- अॅट्राॅसिटी अॅक्ट संदर्भातील सर्व खटले चालवविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापणा तात्काळ करण्यात यावी या प्रमुख मागणी साठी येत्या २६,आॅगस्टला भव्य मशाल मोर्चा संदर्भातील निवेदन मा तहसीलदार यांना दिले. या वेळी रिपाई(अ) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशदादा कांबळे तसेच भिमराव कांबळे, प्रफुल्ल दामोदरे, यशपाल कांबळे, संतोष साळवे, बापु वाघमारे, सुहास ओहोळ, उत्तरेश्वर कांबळे, मयुर कांबळे, बापु धायतोंडे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.



















