सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.१३.०६.१९
करमाळा- संजयमामा शिंदे यांनी विधान सभा लढवावी का नाही यावर चर्चा करण्यासाठी (दि.१३) रोजी संजयमामा शिंदे समर्थकांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस ३०० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थीत होते.करमाळा तालुक्यात संजयमामा शिंदे यांनी खुप ताकतीने व विकासाच्या जोरावर गट तयार केला आहे. संजयमामा शिंदे यांनी लोकसभा लढवली परंतु अपयश आले. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते. आता विधानसभा मामांनी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. करमाळ्यात झालेल्या या बैठकित मामांना भेटून विधानसभा लढवण्याची विनंती करणार असल्याचे ठरविल्याने कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देतील का? यावर मामा काय निर्णय घेतात याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



















