चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश्वर पि. शेंडे
दि.१२.११.१९
नागभिड- तालुक्यातील येनोली माल येथे दरवर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या गावची रुढी व परमंपरा चालत असलेली ही पद्धत आहे विशेष म्हणजे या कार्तीक पोर्णिमे निमीत्य दर वर्षी नविन व काहीना काही नविन शिकवण असते या वर्षात त्यांनी गावामध्ये शौचतेचा व शिक्षणाचा संदेश सांगत असे नवनविन संदेश व विचार लोकांना जागृत करण्यासाठी कार्तीक पोर्णिमेला निरनिराडे उपक्रम शाळेतील मुल करीत असतात
या गावातील एक विशेष म्हणजे सर्व जातीतील लोक प्रत्येक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करुण सर्व जातीय लोक एकत्र असतात व सार्वजनीक कार्यक्रमाला एकत्र करतात
कोजागीरी पोर्णिमे पासुन तर कार्तीक पोर्णिमे पर्यंत रोज सकाळी पाहाटेला काकळ आरती होत असते व त्यामध्ये वारकरी भजने म्हटले जातात व आजच्या दिवशी म्हणजे कार्तीक पोर्णिमेला २ दिवस एक्का उभा करतात व पहील्या दिवशी दुपारी १२ वाजे पासुन भजनाला सुरुवात करुण एक रात्र व दुसर्या दिवसी पर्यंत भजनाचा कार्यक्रम सुरु असतो व दुसर्या दिवसी त्याची समाप्ती होते व सायंकाळी त्याचा दहीकाला करुण उभारलेली दिंडी शिरवितात व सर्व गावातील लोक मग गावपंगत म्हणजे एकत्रीत जेवण करुण रात्रीचे कार्यक्रम करीत या कार्तिक पोर्णिमेची समाप्ती करतात व या करीता सर्व गावाची एक्की व जातीवाद पाहण्यास मिळत नाही.



















