पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०५.२०२०
पुणे- संपुर्ण देश कोरोना या महाभयानक संकटाचा सामना करीत आहे.या कार्यात मेडिकल स्टाफ,पोलीस यंत्रणा, प्रशासन यंत्रणा,स्वच्छता कर्मचारी हे कोरोना वॉरीयर्स समोरासमोर कोरोनाशी लढा देत आहेत.काही भागात नागरिक अशा वॉरियर्स चे आभार मानत आहेत.अशाच
राणी गुणाजी खरात या
ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे येथे स्टाफनर्स या पदावर कार्यरत आहेत.त्यांनी सलग २१ दिवस कोविड १९ या आजारावर उपचार करण्यासाठी असलेल्या वॉर्ड मध्ये कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांना सेवा दिली व आजच त्या आपल्या निलकमल सोसा ,इंदिरानगर,पुणे या घरी परतल्या.त्यावेळी परिसरातील सर्व महिला व पुरुष आपापल्या दारात उभे राहून राणी खरात यांचे स्वागत केले त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला ,सर्वांनी टाळ्या वाजवून कौतूक केले, घरातील सर्व मंडळी आनंदात होती सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.हा खूप भावुक करणारा क्षण होता.घरातील व शेजारील महिलांनी त्यांचे औक्षण केले.
विषेश म्हणजे त्यांना ५ वर्षाची लहान मुलगी (मृणाल)आहे तिला आजीकडे सोडून २१ दिवस त्यांनी ससून रुगणालायत सेवा दिली आहे.राणी खरात यांच्याबद्दल सर्व परीसरातून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.खरात परिवार सोबत जरीचंद्र शिंदे,भीमराव कानडे, मुकेश शिंदे, आणि परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने प्रवक्ते रघुनाथ कदम यांनी राणी खरात यांचे अभिनंदन मानले.



















