🌑 अन्याय करणाऱ्या विरोधात एकत्रित राहणे काळाची गरज- जी.प.सदस्य गजानन बुटके
🌑 बिरसा मुंडा पुतळा उभारणी साठी दहा हजार रुपयांची मदत जाहीर
चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
चिमूर,तालुक्यातील नवतळा येथे आदीवासी समाजाच्या वतीने वीर क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी सन १८७५ ला अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांविरोधात लढा उभारला होता असा इतिहास असताना समाजातील अठरापगड समाज विखुरला असून प्रत्येक समाजात संघटन असणे आवश्यक असताना बिरसा मुंडा चे विचार समाज बांधवांनी आत्मसात करणे गरजेचे असून कांग्रेस पक्ष आपल्या सोबत असल्याचे सांगत जीप सदस्य गजानन बुटके म्हणाले की समाजाला दिशाहीन करणाऱ्या त्या तथाकथित राजकीय नेत्याविरोधात सावध राहण्याचे सांगत बिरसा मुंडा पुतळा उभारणी कामासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देत पुढील बिरसा मुंडा जयंती दिनी लोकार्पण सोहळा साठी प्रयत्न असल्याचे सांगत समाज बांधवांनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले.
नवतळा येथील वीर क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती निमित्य कार्यक्रमातील अध्यक्ष स्थानावरून विधान सभा कांग्रेस चे नेते तथा जीप सदस्य गजानन बुटके बोलत होते.उदघाटक पणन महासंघ पुणे संचालक घनश्याम डुकरे यावेळी विशेष अतिथी जीप सदस्या ममता डुकरे सरपंच नथुजी मडावी,उपसरपंच महादेव कोकोडे,सौ.दिक्षा शैलेंद्र पाटील अध्यक्षा युवक काँग्रेस विधानसभा चिमूर हभप पंढरीनाथ ठाकरे महाराज,अंकुश ननावरे,रितूराज आत्राम अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस चिमूर माजी प्राचार्य परशुराम उईके राजू पेदोर। नामदेव गेडाम,तमुस अध्यक्ष पुरुषोत्तम चदुके अनिल भैसारे ग्राम पंचायत सदस्य रजनी कुमरे,शैलेश पाटील आदी उपस्थित होते.
उदघाटक घनश्याम डुकरे म्हणाले की आदिवासी समाजातील बिरसा मुंडा नी केलेले कार्य महान असून त्यांनी अन्याय अत्याचार विरोधात संघर्स केला तसाच संघर्ष करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले
प्रास्ताविक सरपंच नथुजी मडावी तसेच संचालन अकबर रामटेके तर आभारप्रदर्शन शुभम पारखी यांनी केले.गावातून क्रांतिवीर बिरसा मुंडा च्या प्रतिमेची मिरवणूक वाद्याच्या निनादात निघून सदर कार्यक्रमास मोट्या संख्येने गावकरी उपस्थित होते.



















