सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.११.१९
करमाळा- बहुतांश महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल हे पाहिले पाहिजेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री रणजितसिंह निबाळकर यांनी त्यांच्यातर्फे मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व आर्थिक मदत केल्याचा दावा केला आहे. हा सपशेल खोटा प्रकार असून ते करमाळा तालुक्यात तर आलेच नाहीत. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात व बातमीत म्हटले आहे की त्यांनी पाहणी दौरा केला. हे सरळसरळ खोट आहे असे खोटे बोलून खासदार साहेब आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. ते आजारी होते तर ठीक आहे त्यांनी तस तालुक्यातील शेतकरी व मतदार यांना सांगायला हवं होतं लोकांनी समजून घेतलं असतं. पण प्रत्यक्षात बांधावर न येताही खोटा दावा होत असेल तर ती तालुकवासीयांची क्रूर थट्टा आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे सोशल मीडीया करमाळा तालुका अध्यक्ष नितीन झिंजाडे यांनी निर्भिड पत्रकारच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.



















