महाबळेश्वर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५/२/१९
महाबळेश्वर येथील गिरीस्थान नगरपरिषद महाविद्यालयास जेष्ठ समाजसेविका छायाताई शिंदे यांनी भेट दिली यावेळी नवनियुक्त प्राचार्य निशिकांत लहाने यांचे बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान या विषयावर बनविलेल्या माहितीपटाचे प्रोजेक्टर प्रदर्शन करण्यात आले.ते पाहून छायाताई शिंदे यांनी समाधान व्यक्त केले व सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे आवर्जून नमूद केले.नवनियुक्त प्राचार्य निशिकांत लहाने आपल्या महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.छायाताईंच्या समवेत याप्रसंगी गोरखनाथ शिंदे,बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे विकास ओव्हाळ, सुमित कांबळे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच यावेळी प्राचार्य निशिकांत लहाने,प्रा.डॉ. बाजीराव शेलार,प्रा.संतोष आखाडे,प्रा.शशिकला रणदिवे यांचेसह महाविद्यालयातील सर्व स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















