चंद्रपुर ( निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क ) विकास खोब्रागडे- दि.२९/०७/२०१८
चिमूर – भद्रावती तालुक्यातील मोहुर्ली गेट येथे आज जागतिक व्याघ्र दिना निमीत्त ताडोबा वनविभाग बफरक्षेत्रातील दुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थी १० च्या परीक्षेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेल्या विद्यार्थाचा सत्कार मा.ब्रिजभूषण पाजरे सभापती समाजकल्याण चंद्रपूर, मा. मुकुल त्रिवेदी साहेब संचालक वनविभाग बफर ,मा. नरवणे साहेब उपसंचालक बफर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पळसगाव वनपरिक्षेत्रातील बफर झोन क्षेत्रातील कुमारी.धनश्री संजय सोनेकर रा,पळसगाव हिला वर्ग १० वि मध्ये ८७ % गुण मिळूवून प्रथम क्रमांक पटकावला.त्या बद्दल तिचे मा. लोखंडे साहेब वनपाल पळसगाव वनकर्माचारी, नवरगाव येथील भारत विद्यालय च्या शिक्षकानी व पालकांनी तिचे अभिनंदन केले आहे. योग्य मार्गदर्शन व तिने केलेली अचूक अमलबजावणी ,सातत्य ,चिकाटी त्या मुलीनी केलेली मेहनत या मुळे हे यश मिळाले असे मत .मा,मुरकुटे मॅडम वनपरीक्षेत्र अधिकारी बफर पळसगाव यांनी निर्भिड पत्रकार च्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले, त्या सर्व गुणवंत विद्यार्थीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.



















