पिंपरी चिंचवड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अमर सुर्यवंशी
पिंपरी, बामसेफ भारतीय विद्यार्थी मोर्चा बोपोडी पुणे शहर आयोजित राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १९२ व्या व विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक सभेचा आणि विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटक मा.रियाज पिरजादे मुस्लिम एकता मंच,त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी मा.जयकर गायकवाड,भारतीय विद्यार्थी मोर्चा,माता सावित्रीमाई फुले विद्यापीठ पुणे शहर, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले मा रविंद्र कचरे डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन लंडन विशेष अतिथी म्हणून आवर्जुन उपस्थित असलेले फुले शाहू आंबेडकरी चळवळ आपल्या कवितेतून गतिमान करणारे मा हरिश्चंद्र धिवार,मा.शारदा जाधव मॅडम,मा.वंदना भोसले मॅडम,मा.निखिल गडकर साहेब भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष पुणे शहर, कार्यक्रमाचे वक्ता गण मा.प्रतिक भोसले,मा.विक्की तलेल्लू,मा.तुषार गाडेकर,मा.अमित नाईक,मा.सौरव शिंदे,सदर कार्यक्रमात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन मा.साक्षी भोसले,मा.अश्विनी नाईक,मा.प्रतिक्षा नाईक यांनी आपल्या गोड आणि सुस्पष्ट कणखर आवाजात वाचन करुन उपस्थितांकडून संविधान प्रतिज्ञेदवारे करुन घेतली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा चे सक्रिय कार्यकर्ते मा प्रतिक भोसले,मा विक्की तलेल्लू,मा अक्षय भोसले, मा तुषार गाडेकर, मा सौरव शिंदे, मा अमित नाईक यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीपणे पार पाडला.



















