सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.१७.०९.१९
फलटण- तरडफ येथील कृषिराज ऍग्रो इंडस्ट्रीज अँड गोट फार्म येथील शेळ्या चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शेतकऱ्यांनी चांगला समाचार घेतला. या फार्मवर ४ कुख्यात चोरट्यांनी मंगळवार दि. १७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दीडच्या सुमारास मुकेश माणिक जाधव,दिगंबर नाना जाधव,राहुल राजेंद्र जाधव,अफसर बबलु ईनामदार सर्व रा.सगुणामाता नगर,मलठण,फलटण यांनी संरक्षक भिंतीवरील जाळी तोडून १० उत्कृष्ट जातीच्या शेळ्या त्यांच्या जिभिला टाचण्या टोचुन चोरून नेण्याचा प्रयत्न केला. संशयास्पद हालचाल आढळून आल्याने सावध झालेल्या कामगारांनी त्वरित मालक वैभव मदने यांना फोन करून माहिती दिली. नंतर मदने यांनी थोड्याच वेळात २०० मित्रांच्या फौजफाट्यासह संबंध शिवाराची नाकाबंदी केली.५० मोटारसायकल्सचा ताफा संबंध शिवारात फिरत होता.दाट उसामुळे शोध घेणे कठीण होते. तरीही सर्व नाकेबंदी करून चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना नऊ शेळ्यांच्या जिभेला टाचण्या टोचुन तोंड बंद बांधलेल्या अवस्थेत त्यांना सापडल्या.या घटनेची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली आहे. तीनजण दुचाकीवरून पळून गेले. एक चोरटा उसामध्ये लपून बसला होता.सकाळी सहाच्या सुमारास ग्रामस्थांना तो सापडला.दिगंबर नाना जाधव असे त्याचे नाव आहे त्याला ग्रामस्थांनी चांगला चोप दिला त्यावेळी त्याने एक शेळी चोरून फरार झालेल्या संशयित इतर तिघांची नावे सांगितली आहेत.त्यावेळी केलेल्या मारहाणीत जखमी झाल्याने त्याला पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी चौघा जणांवर शेळ्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनात चालू आहे.



















