चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.१०.१९
◆ २० उमेदवारांचे अर्ज अपात्र
◆ ७ ऑक्टोबरला अर्ज परत
घेण्याची तारीख
चंद्रपूर- राज्यात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. ४ ऑक्टोबर १९ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ११० उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यातील ९० उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले असून २० उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहे. ७ आक्टोंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.
◆ राजुरा
मतदारसंघातून २० पैकी १६ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले असून यामधे अपक्ष म्हणून जयराम चरडे, पंकज पवार, तुकाराम पवार, रेशमा चव्हाण, शामराव सलाम, भारत आत्राम, संतोष येवले, रामराव चव्हाण, अनिल सिडाम, तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सुभाष धोटे, स्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटप, बहुजन समाज पार्टी कडून भानुदास जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून गोदरू जुमनाके, भारतीय जनता पार्टी कडून ऍड. संजय धोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून महालिंग कंठाळे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून प्रवीण निमगडे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांना मध्ये विद्यासागर कासार्लावार, आशिष करमरकर, प्रदीप देशमुख, आनंदराव अंगलवार यांचा समावेश आहे.
◆ चंद्रपूर
मतदारसंघातून १७ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून संदीप पेटकर, तथागत पेटकर, ज्योती रंगारी, सुधाकर कातकर, हरिदास लांडे, किशोर जोरगेवार, मंदिप गोरडवार प्रियदर्शन इंगळे, तसेच भारतीय जनता पार्टी कडून नानाजी शामकुळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून बबन रामटेके, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया कडून नामदेव गेडाम, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून महेश मेंढे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून अमृता गोगुलवार, बहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकर, बहुजन समाज पार्टी कडून सुबोध चूनारकर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडून ज्योतीदास रामटेके यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. अपात्र उमेदवारांनामध्ये हर्षवर्धन पिपरे यांचा समावेश आहे.
◆ बल्लारपूर
मतदारसंघातून १८ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून बंडू वाकडे, अशोक तुमराम, सागर राऊत, तारा काळे, नितीन भटारकर, संजय गावंडे, अनेकश्वर मेश्राम, तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून मनोज आत्राम, बहुजन समाज पार्टी कडून सरफराज शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून अरुण कांबळे, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून डॉ. विश्वास झाडे, आम आदमी पार्टीकडून ताहेर हुसेन, भारतीय जनता पक्षाकडून सुधीर मुनगंटीवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी कडून राजेंद्र वैद्य, वंचित बहुजन आघाडी कडून राजू झोडे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून सचिन टेंभुर्णे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांनामध्ये रमेश कडुकर, विनोद सिडाम, यांचा समावेश आहे.
◆ ब्रह्मपुरी
मतदारसंघातून १९ पैकी १४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये अपक्ष म्हणून वसंत वाजुरकर, प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे, अजय पांडव, धानु वलथरे, दिलीप शिवरकर, विनय बांबोडे, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून विजय वडेट्टीवार, आम आदमी पार्टीकडून पारोमिता गोस्वामी, शिवसेना पक्षाकडून संदीप गड्डमवार, बहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्राम, बहुजन समाज पार्टी कडून मुकुंदा मेश्राम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगे, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून जगदीश पीलारे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांनामध्ये सुशील वासनिक, गुरुदेव भोपये, पौर्णिमा भिलावे, अनुकूल शेंडे, मनोहर बांबोळे यांचा समावेश आहे.
◆ चिमूर
मतदारसंघातून १६ पैकी १४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून यामध्ये अपक्ष म्हणून कैलास बोरकर, गजेंद्र चाचारकर, अजय पिसे, अमृत नखाते, किशोर घोनमोडे, धनराज मुंगले, रमेशकुमार गजबे, हरिदास बारेकर, तसेच अखिल भारतीय मानवता पक्षाकडून वनिता राऊत, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सतीश वाजुरकर, बहुजन वंचित आघाडी कडून अरविंद सांदेकर, बहुजन समाज पार्टी कडून सुभाष पेटकर, भारतीय जनता पार्टी कडून किर्तिकुमार भांगडीया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष कडून प्रकाश नान्हे यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरला आहे. अपात्र उमेदवारांनामध्ये विलास डांगे, रमेश मडावी, यांचा समावेश आहे.



















