चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.०७.०७.१९
चंद्रपुर- आदरणीय जनसामान्यांचे कैवारी,बहुजनांचे हृदय सम्राट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष महेश भारतिय सर यांच्या आदेशानुसार चंद्रपुर येथे सम्यक विद्यार्थी आंदोलना तर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन सम्यकचे विद्यार्थी कार्यकर्त मा.सिद्धार्थ शेंडे यांनी तुकुम, चंद्रपूर येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सम्यक चे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. धिरज तेलंग यांनी विद्यार्थ्यांना विविध विषय घेऊन मार्गदर्शन केले. यामध्ये सम्यक च्या पुढील वाटचाल कशी करता येईल यावर चर्चा करण्यात आली. सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनात्मक चळवळ कशे वाढवता येईल यावर मार्गदर्शन करण्यात केले. चंद्रपुर जिल्यातील महाविद्यालयीन निवडणुका दोन महिन्यानंतर चालु होनार आहेत या महत्वाच्या मुद्यावर आवर्जून चर्चा करण्यात आली. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मध्यमातून विध्यार्थी नोंदणी मोहीम राबवण्यात यावी यावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाकरिता सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची मोट्या प्रमाणात उपस्थिती होती.



















