चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.३.१०.१९
चिमूर- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक प्रक्रीया अंतर्गत,चिमूर विधानसभा मतदार क्षेत्राकरीता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरविंद सांदेकर यांनी उमेदवारी अर्ज,निवडणूक निर्णय अधिकारी चिमूर यांच्या आज कडे दाखल केला.वंचित बहुजन आघाडीच्या चिमूर प्रचार कार्यालया पासून,उमेदवारी अर्ज सादर करणारी रॅली काढण्यात आली.रॅली चिमूर वरोरा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असतांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यास उमेदवारासह मान्यवरानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे,चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे सह इतर कार्यकर्ता वर्ग व चिमूर विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक,आयाबहिणी हजर होते.चिमूर- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक प्रक्रीया अंतर्गत,चिमूर विधानसभा मतदार क्षेत्राकरीता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरविंद सांदेकर यांनी उमेदवारी अर्ज,निवडणूक निर्णय अधिकारी चिमूर यांच्या आज कडे दाखल केला.वंचित बहुजन आघाडीच्या चिमूर प्रचार कार्यालया पासून,उमेदवारी अर्ज सादर करणारी रॅली काढण्यात आली.रॅली चिमूर वरोरा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असतांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यास उमेदवारासह मान्यवरानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे,चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे सह इतर कार्यकर्ता वर्ग व चिमूर विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक,आयाबहिणी हजर होते.



















