चंद्रपुर (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
चिमूर येथील नेताजी वार्ड मध्ये वास्तव्याने राहत असलेले नवभारत दैनिक वृत्तपतत्राचे पत्रकार इम्रान कुरेशी हे आपल्या कुटूंबियांसह नागपूर ला गेले असता अज्ञात चोरट्यानी धाडसी चोरी करीत जवळ पास दोन लक्ष रुपये लंपास केला असल्याची माहिती समोर आली असून पि.एस.आय इंगोले यांनी घटनास्थळी पोहचून चौकशी केली. व चिमूर येथील दैनिक नवभारत चे पत्रकार इम्रान कुरेशी यांचे लहान भावाचे लग्न पुढील महिन्यात असल्याने त्यांचे संपूर्ण कुटूंब नागपूर ला खरेदी साठी गेले असता घरी कोणीच नव्हते याचा फायदा घेत ही संधी अज्ञात चोरट्याने साधल्याने कुलूप तोडून चोरी केली व त्यात १ लाख ७० हजार रोख रक्कम व २ तोळे सोने चोरी ला गेल्याचे सांगण्यात आले आहे.व कुटुंबातील काही सदस्य दि.११/११/२०१८ ला दुपारच्या ३:०० वाजताच्या सुमारास चिमुर येथे घरी परत आल्याने त्यांना कुलूप तोडून असल्याचे दिसले तेव्हा त्यांनी चिमूर पोलिस स्टेशन ला तात्काळ माहिती दिली व घटनास्थळी पोलिसांच्या पथकांनी मिळून तपास केला व त्यांनतर आज दि.१२/११/२०१८ ला चिमूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद मडामे तसेच ब्रम्हपुरी चे उप विभागीय पोलिस अधिक्षक प्रशांत परदेशी पि. एस.आय.गणेश इंगोले,पि.एस.आय.अलिम शेख पोलिस विजय उपरे ,व मोबाईल फॉरेन्सिक इन्वेस्टिगेशन पथक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व पुढील तपास चिमुर पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पि.एस.आय गणेश इंगोले करीत आहे.



















