चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.२३.०७.१९
चिमूर- चिमूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या तर्फे घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा चिमुरच्या बालाजी मंदिरातील सभागृहात नुकतेच पार पडले. कार्यक्रमात सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पानसे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ मुंबई, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भैयासाहेब बेहेरे उपविभागीय अधिकारी चिमूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप रामटेके उपाध्यक्ष पूर्व विदर्भ मराठी पत्रकार संघ, सुनील बोकडे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ चंद्रपूर, जितेंद्र चोरडिया कार्याध्यक्ष चंद्रपूर, राजू कुकडे सरचिटणीस चंद्रपूर, चिमूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे, चिमूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, हे व्यासपीठावर उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी बेहेरे बोलताना सांगत होते की, आजचे जग हे स्पर्धेचे युग असून, या स्पर्धेत टिकायचे असेल तर दुसर्याला ९९% मिळाले तर त्या व्यक्तीची बरोबरी केली आणि स्वताला १००% मिळाले तर आपली स्पर्धा तिथेच संपते त्या करिता त्या व्यक्तीची बरोबरी न करता स्वताचीच बरोबरी करा तेव्हाच शेवटच्या घटकापर्यंत स्पर्धा टिकते. आणि जगायला पण मजा येते. या स्पर्धेत जीवनात काही तरी बनायचं आहे हा उद्देश ठेऊन स्पर्धा करायची शिका असे यावेळी सांगितले, तर अध्यक्षीय भाषणात महेश पानसे बोलत होते की, जीवनात व्यक्तीला शिकतांना या इतर गोष्टी करिता खूप अडचणी निर्माण होत येत असतात, पण या येणाऱ्या अडचणीचा सामना करून समोर जाणे म्हणजे हीच स्पर्धा जो या स्पर्धेत स्पर्धा करायची शिकला तोच या जीवनात टिकला असे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी तालुक्यातून बारावी व दहावी प्रथम व द्वितीय आलेल्या गुणवंतांचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला असता, तालुक्यातील प्रत्येक गावातील १० वि मधील ७४ मुलंमुली व १२ वि मधील २४ असे एकूण ९८ मुलामुलींचे पाहिले व द्वितीय क्रमांक आलेल्या व नागपूर विद्यापीठ गोल्ड मेड्यालिस्ट गुणवंत विद्यार्थ्याचे शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गैरविण्यात आलेले आहे.यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी, कार्याध्यक्ष रामदास ठुसे, सरचिटणीस कृष्णकुमार टोंगे, संघटक विलास मोहिणकर, कोषाध्यक्ष सुभाष रामटेके, प्रसिद्धीप्रमुख सूरज नरुले, उपाध्यक्ष प्रमोद राऊत, दामोदर रामटेके, सहसंघटक उपक्षम रामटेके, रोहित रामटेके, गणेश गभने, विकास खोब्रागडे, गुणवंत चटपकर, शुभम पारखी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे वेदांत मेहरकुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डाँ. कृष्णकुमार टोंगे यांनी केले.



















