नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.२४.१०.१९
येवला-सर्व राज्याचं लक्ष लागून असलेल्याया येवला लासलगाव मतदार संघांचे उमेदवार तसेच माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे विरोधी उमेदवार सेनेचे उमेदवार संभाजी राजे पवार यांचा दारुण पराभव केला आहे. भुजबळ हे सलग चौथ्यांदा निवडून आले आहे. त्याचे सहकारी असलेले माणिकराव शिंदे यांनी ऐनवेळी संभाजी राजे पवार यांना पाठींबा दिल्याने. ते एकाकी पडले होते. परंतु भुजबळांचे विकास कामे आणि पुढे ही विकास करणार या भूमिकेने मतदारांनी त्याना कौल दिला. भुजबळ जरी निवडून आले असले तरी त्यांचे पुत्र नांदगाव मतदार संघातून प्रभावित झालेले आहेत त्यामुळे भुजबळांच्या एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू अशी परिस्थिती आहे.



















