सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११/३/१९
सातारा,जकातवाडी गावचे सुपुत्र मा श्री आतुल कुंभार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली या बद्दल ग्रामपंचायत जकातवाडी व ग्रामस्थांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. त्याच बरोबर सातारा मधील प्रसिद्ध व्याख्याते ज्यांनी पंधरा वर्षे व्यसन मुक्ती अंधश्रद्धा युवा शक्ती आशा अनेक विषयांवर समाजप्रबोधन करतात त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले मा श्री किशोर काळोखे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी मा अतुल कुंभार म्हणाले गावाने केलेला सन्मान हा प्रेरणा देणारा ठरेल तसेच किशोर काळोखे यांनी युवकांना युवा शक्ती आणि युवकांची कार्य आणि जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जकातवाडी गावचे सरपंच चंद्रकांत सणस, ग्रामपंचायत सदस्य उत्तम सणस, शंकर दळवी,सखुबाई देशमुख,सुजाता माने,बिस्मिल्ला शेख,सोनाली शिंदे,विनायक मोहिते,योगेश शिंदे,अनिल कांबळे,धनराज दौंडे,उत्तम भोसले,मंगेश शिंदे,तुशांत माने, विक्रम शिंदे,बाबू जाधव,दीपक देवकर,सागर पोगडे,श्रेया दळवी,देवरे, राजेश भोसले यांनी प्रस्थाविक केले व प्रा.प्रल्हाद पार्टे यांनी आभार मानले.



















