पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२९.०९.१९
पिंपरी-वाकड येथे स नं.१९३/४ मधे दहा गुंठे क्षेत्रात केटरिंग व्यवसायासाठी अरूण खंडेलवाल यांच्याकडून भारती गायकवाड यांनी हा प्लॉट भाडेकरार तत्त्वावर घेतला होता.अचानक या जागेवर काही गावगुडांनी येवून हैदोस घातला व गायकवाड आणि त्यांच्या सोबतच्या महिलांना दमबाजी केली.याच्या विरोधात संबंधित महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.परंतू त्यांची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली नाही.महिलांची उलटतपासणी करून पोलिसांनी त्यांना परत पाठवले.त्याचवेळेस महिलांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय गाठले आणि त्यांची कैफियत मांडली.सदरील प्रकरणात कारवाई न झाल्यास पोलिस आयुक्त कार्यालयासमोरच आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



















