सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.०२.०८.१९
करमाळा- तालुक्यातील जिंती गावामध्ये एक आॅगस्टला भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय दशरथ अण्णा कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला महासचिव शहाजी ठोसर तालुकाध्यक्ष सुभाष बापू ओहोळ आप्पा भोसले दत्तात्रय गायकवाड पप्पू धेंडे उपस्थित होते. शाखेचे अध्यक्ष अंकुश गुरगुळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले प्रस्ताविक सचिव संदीप जगताप यांनी केले सुभाष बापू यांनी आपल्या भाषणात तरुणांना कोणत्याही दबावाला बळी पडून काम करू नका असे सांगितले अध्यक्षीय भाषणात दशरथ कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडी ही कोण्या एका व्यक्ती विरोधात नसून ही सत्तेच्या माध्यमातून पैसा व पैशांच्या माध्यमातून सत्ता उपभोगणाऱ्या विरोधात आहे. पुढे बोलताना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला दीड दिवस शाळा शिकलेला सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या हिमतीवर देशातील महान लोकशाहीर होऊ शकतो त्यासाठी तुमच्या मध्ये ती प्रबळ इच्छा असणे आवश्यक आहे. तरुणांनी अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीमध्ये भाग घेऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपले योगदान द्यावे व येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांना आपण मुख्यमंत्री होताना पाहीजे आहे यासाठी सर्व तरुणांनी एकत्रित येऊन वंचित बहुजन आघाडीचे काम करणे आवश्यक आहे असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य दत्ता धेंडे, दत्ता शेलार, श्याम धेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गौतम धेंडे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जगताप, दादा धेंडे, मधुकर जगताप, प्रेमलाल धेंडे, रमेश आबा धेंडे, अमर धेंडे, जितेश धेंडे, सागर जगताप, अरविंद धेंडे, सुखदेव शेलार, अजय धेंडे, निखिल धेंडे, विकास धेंडे, सुधाकर धेंडे, बापू धेंडे सोमनाथ खिलारे, अक्षय धेंडे, अमोल उघडे, विशाल गायकवाड, अक्षय चव्हाण, आनंद शिंदे सर कात्रज, आंबोधरे सर भिलारवडी, सुधाकर मोरे, अक्षय जगताप, दादा धेंडे, परमेश्वर धेंडे, योगीराज चव्हाण, नवनाथ चव्हाण, आबा शिंदे, संदीप शिंदे, अवी शेलार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धर्मेंद्र धेंडे यांनी केले व आभार तानाजी चव्हाण यांनी मानले.



















