उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,अभय गायकवाड
दि.२८.११.१९
उस्मानाबाद- भारतीय संविधान दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवार (दिनांक 26 नोव्हेंबर )रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शुभांगी आंधळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, तहसलिदार, महसूल राजकुमार माने, तहसिलदार सामान्य अभय मस्के यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तसेच भारतीय संविधान
दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयातही भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी दुरमुद्रकचालक, श्री.नंदू पवार, सर्वसाधारण सहायक श्रीमती चित्रा घोडके, लिपिक नि-टंकलेखक श्रीमती कविता राठोड, रोनिओ ऑपरेटर श्री. अनिल वाघमारे, संदेशवाहक श्री.शशिकांत पवार यांची उपस्थिती होती.



















