I
दि.२४.०४.१८ टाकळसिंग,आष्टी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमांची सुरुवात २४ तारखेला किरण शिंदे संस्थापक अध्यक्ष बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य यांच्या व्याख्यानाने झाली.आपल्या व्याख्यानात किरण शिंदे यांनी सर्व महापुरुषांचे विविध पैलू विशद केले.तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या प्रगती मध्ये सर्वात जास्त योगदान दिले असून त्यांचे व्यक्तिमत्व हे सर्वव्यापी होते असे विचार मांडले. हे सांगताना त्यांनी आपल्या कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.यावेळी उपस्थितांचा मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी कांतिलाल जोगदंड सरपंच,राजेन्द्र जगताप उप सरपंच,संतोष रा.जोगदंड जयंती अध्यक्ष,राहुल जोगदंड ग्रा.सदस्य, लाला जगताप ग्रा.सदस्य,सयाजी जोगदंड सा.कार्यकर्ते, भाऊसाहेब नेटके,युवराज नेटके,दादा जोगदंडसर,दिगंबर जोगदंड मुख्यध्यापक,कैलासजोगदंड,अनिल जोगदंड,सतीश आनंद जोगदंड, शान्तिलाल जोगदंड,स्वप्निल जोगदंड,बद्रीनाथ जगताप (प.स.आष्टी सदस्य)संदीप जोगदंड,विकास ओव्हाळ,सुमित गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.



















