सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.४.०१०.१९
फलटण- डाॅ.संजय राऊत अपहरण प्रकरणामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याकडे गु.र.न.७०/१९भादवि कलम ३६४,३९७,३९५ वगैरे हा गुन्हा दाखल होता.सदर गुन्हयातील एकूण ५ आरोपींना गुन्हा घडल्यानंतर पहिल्या आठवड्यात फलटण शहर पोलीसांनी अटक केली होती. परंतु २ मुख्य आरोपी फरार होते. मागील आठवड्यात त्यापैकी किशोर आवारे रा.मंगळवार पेठ यास अटक केले होते.याबाबतची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.डी.पोमण यांनी दिली आहे शेवटचा या गुन्ह्याचा सूत्रधार ज्याने सदर गुन्ह्या मध्ये गाडी पुरवली होती तो समीर मल्हारी नरुटे, वय-२५ वर्षे, रा.काजड.ता.इंदापूर.जि.पुणे यास बारामती येथून फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.संदीप बनकर, पोलीस काॅं.दत्ता नाळे, पो.हवा.अशोक वाडकर,पोलीस नायक.लावंड या पथकाने ताब्यात घेतले. सदर गुन्हयामध्ये अटक केले आहे.सर्व आरोपी अटक झाल्यामुळे गुन्हेगारांवर चाप बसला आहे.सदर घटनेमुळे व आरोपी फरार असल्यामुळे डाॅ.राऊत यांना संरक्षण पुरविण्यात आले होते. सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षकसो तेजस्वी सातपुते, मा.अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील,मा.उपविभागीय पोलीस आधिकारी,फलटण विभाग तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्री.संदीप बनकर,पोलीस काॅं.दत्ता नाळे,पो.हवा.अशोक वाडकर पोलीस नायक.लावंड या पथकाने केली आहे.



















