पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३१.०८.२०१२१
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे संस्थेच्या प्रभारी महासंचालक पदाचा कार्यभार श्री.दि.रा.डिंगळे, सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे सोपविण्यात आला. श्री.दि.रा.डिंगळे, सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी बार्टी मुख्यालयातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. व प्रभारी महासंचालक बार्टी, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सामाजिक समतेचे विचार व त्यांना अभिप्रेत कार्य बार्टी संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी व तळागाळातील लोकांपर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व बार्टी संस्थेच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविणार असून वंचित घटकांना न्याय देण्यासाठी काम करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. श्री.प्रवीण कोरगंटीवार, प्रभारी निबंधक, बार्टी पुणे यांनी श्री.दि.रा.डिंगळे, यांना संविधानाची प्रत भेट देऊन स्वागत केले यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.