चंद्रपुर(निर्भीड न्यूज नेटवर्क)विकास खोब्रागडे
चिमूर- बौद्ध समाज पंच कमेटी, रमाबाई महिला मंडळ डाँ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना काग यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जंयती दीनाचे औचीत्य साधून मौजा काग (चिमूर ) येथे तथागत भगवान गौतम बुध्द जयंतीचा कार्यक्रमा निमित्य महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मा सुरेंद्रभाऊ डोंगरे यांच्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम काग चिमूर येथे करण्यात आला. धम्मक्रांतीचा प्रचार, प्रसार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जनमानसात रुजविण्याचे काम त्या काळात लोककवि व गीतकारांनी केले. शुक्रवारला रात्रो ९ वाजता मैत्र बुद्ध विहार येथे सामाजिक बुद्ध भीम,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गाडगे महाराज यांच्या गीताचा आयोजित कार्यक्रम साजरा करण्यात आला.सुरेंद्रभाऊ डोंगरे यांच्या गीतांमधून भगवान गौतम बुद्ध यांच्या हे जीवनावर आधारित उदाहरणांसह यांच्या जीवनावर प्रकाश टाकला डोंगरे भाऊ यांनी वंचित पीडित समाजाचे धम्मप्रचारासह समाजाचे प्रश्नसुद्धा गीतांमधून मांडले.सदर कार्यक्रमास अध्यक्ष मा. प्रभूदास मेश्राम,अ.भा.बौद्ध महासभा,मनोज रामटेके सचिव अ. भा. बौद्धसमाज,मान्यवरच्या हस्ते हस्ते महाकारूनिक शांतीदूत तथागत भगवान बुद्ध व तुमचे आमचे बहुजनांचे उद्धारक बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,माता सावित्रीआई फुले,महात्मा जोतिबा फुले,यांच्या प्रतिमाना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमास परिसरातील धम्म उपासक उपसीका व गावातील नागरीक उपस्थित होते.



















