सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.११.१९
नातेपुते- दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे यांचे बेमुदत अर्धनग्न धरणे आंदोलन सविस्तर वृत्त असे की नातेपुते ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक व वरिष्ठ लिपिक तसेच सिविल सुपरवायझर यांच्या संगनमताने ग्रामपंचायत मधील दोन कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे १२.०८.१५ मासिक मीटिंगच्या प्रोसिडिंग मध्ये खाडाखोड करून पगार वाढ करण्यात आली. त्यामुळे अन्य मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे तर या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून ग्राम विकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून इतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा व १३.०८.१५ पासून आज तागायत सर्व शासकीय पगार पत्रकात खाडाखोड दिसून आलेली आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे तरी यावर काय कारवाई होणार? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.



















