दादर : ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी:
दादर स्टेशन येथे दलित युथ पँथर व बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने दादर जंक्शन चे नाव चैत्यभूमी करावे या मागणी साठी दि.०१ ऑगस्ट रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे आयोजन दलित युथ पँथरने भाईसाहेब जाधव यांचे नेतृत्वात केले होते तर या आंदोलनास बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला होता.या शिवाय या आंदोलनामध्ये अनेक समविचारी पक्ष,संघटणा सहभागी झाल्या होत्या. यावेळी पथनाट्याद्वारे दादरचे नाव चैत्यभूमी का करावे याची जनजागृती करण्यात आली.तसेच या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्ष संघटणाच्या वतीने प्रतिनिधींनी आपापले विचार मांडले.दलित युवा पँथरच्या वतीने निलेश मोहिते,अमोल जगताप,भाईसाहेब जाधव यांनी आपले विचार मांडले तर बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे अध्यक्ष किरण शिंदे,हर्षवर्धन गंभीरे,ऍड.रजनी आगळे यांनी आपले विचार मांडले. किरण शिंदे यांनी जनतेची मागणी नसताना एल्फिन्स्टन स्टेशनचे नाव प्रभादेवी होते,राममंदिर नावाने स्टेशन होऊ शकते तर मग ज्या बाबासाहेबांच्या कार्याने दूरदृष्टीने हा देश घडला त्या बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित ‘चैत्यभूमी’ या नावास कोणत्या मानसिकतेतून विरोध होतोय ? असा प्रश्न ठणकावून विचारला.तर प्रशासनाने लवकरात लवकर दादर स्टेशनचे नाव चैत्यभूमी करावे अन्यथा संवैधानिक मार्गाने चाललेले हे आंदोलन प्रत्येक गावागावामधून उभे राहील व त्यास प्रशासन जबाबदार असेल असे सांगितले. भाईसाहेब जाधव यांनी देखील आपली भूमिक मांडली.यावेळी भीमसैनिकानी “दादरचे नामांतर चैत्यभूमी झालेच पाहिजे”.”जय भिम” या घोषणांनी दादरचा परिसर दणाणून सोडला.यावेळी दलित युथ पँथरच्या वतीने भाईसाहेब जाधव,निलेश मोहिते,अमोल जगताप, विशाल मोरे तर बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने किरण शिंदे,भारत साळवे,हर्षवर्धन गंभीरे,सुहास शिंदे,अनिल जाधव,सुमित गायकवाड,विकास ओव्हाळ,अजय शिंदे,सुचित सावंत,राजेश ढवळे, ऍड.रजनी आगळे,रोहित तुरेराव, पंकज कदम,प्रथमेश कदम,विकास म्हस्के यांचेसह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.



















