पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,दिलीप देहाडे
दि.२६.१०.१९
रूपीनगर- “डिक्काई का हाथ,दिव्यांगोंके साथ”या घोषवाक्या अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमात एकता मित्र मंडळ चौक,रुपी नगर, निगडी या ठिकाणी दिव्यांगांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी या ठिकाणी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या कार्यकारी संचालिका मा. राजश्री गागरे,सोशल मीडिया टिम “डिक्काई” महाराष्ट्र राज्याचे समन्वयक धनराजसिंग चौधरी, समाजसेविका क्षमा धुमाळ,आशा शिंदे, शिवानी गागरे,संदीप जाधव,गजानन काळे यांच्या सह मोठ्या संख्येने दिव्यांगजन उपस्थित होते.
सिद्धी कर्मयोगी फौंडेशन संस्थेच्याच्या अंतर्गत काम करणारी “दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्काई असुन संस्थापक मा. रघुनाथ येमुल यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांना आर्थिक दृष्ट्या सक्षम,यशस्वी व स्वावलंबी बनविण्यासाठी डिक्काई (DICCAI) राष्ट्रीय स्तरावर काम करीत आहे.



















