पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२.१०.१९
चिंचवड- पेंटींग, रांगोळी, आर्ट ॲन्ड क्राफ्ट, चित्र आदीचे माध्यमातून देवीचे रूप प्रकट करणाऱ्या प्रदर्शनाला सुरूवात झाली. येथील अंशुल क्रिएशन, साईराज शिक्षण संस्था व जगद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे. सांगवी येथील साई ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. पिंपरी महापालिकेचे वृक्षप्राधिकरण समिती सदस्य संभाजी बारणे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. लक्ष्मण रानवडे लहू गायकवाड यावेळी उपस्थित होते



















