चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
चिमूर, भीमा कोरेगाव येथील द्विशताब्दी शौर्य समापण सोहळा करीता दीक्षाभूमी चंद्रपूर- नागपूर ते भिमा कोरेगांव १४.११.२०१८ ते १.१२.१९ पर्यंत धम्मयात्रा (पदयात्रा) चे आयोजन भदन्त ज्ञानज्योंती महाथेरो यानी केले आहे या पदयात्रेच आगमन आज दि.२२.११.२०१८ ला शंकरपूर येथे झाले. पदयात्रे मध्ये सहभागी भदन्त ज्ञानज्योंती महाथेरो,व त्यांचा संघ आणि बौद्ध उपासक उपासिकेचे स्वागत हर्शोलासात त्यांच्या मार्गावर सम्पूर्ण शंकरपूर वासीय बौद्ध उपासक उपासिका यानी पुष्प टाकून केले व आलेल्या संपूर्ण भंतेजी व बोद्ध उपासक उपसिकांना शंकरपूर वासीय बौद्ध उपासक उपासिका यांच्या कडून भोजनदान व इतर दान करण्यात आले सदर कार्यक्रमाला सम्पूर्ण शंकरपूर वासी बौद्ध उपासक,उपासिका व गावकरी उपस्थित होते,



















