पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.८.१०.१९.
पिंपरी- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत भीम सृष्टी परिसरात फुलांच्या माळा लावून सजावट करण्यात आली.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे यानी केले. यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे दिनकर ओव्हाळ, अरूण मैराळे, विनोद भालेराव, नवनाथ धोत्रे, कांचन जावळे, दिलीप कांबळे, गिरीश सोनवणे, हरीभाऊ गायकवाड, विठ्ठल गायकवाड, आदी कार्येकर्ते उपस्थित होते.



















