चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०७.१९
◆ आ.किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया व जिल्हा परिषद अध्यक्ष मा.देवरावजी भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला प्रवेश
◆चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला मोठा झटका
चिमूर- भारतीय जनता पार्टीच्या सबका साथ सबका विकास या ध्येय धोरणांवर व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विविध जणकल्याणकारी योजनांवर आणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा तडपदार लोकप्रिय विकासपुरुष आ.श्री.किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे विकास कामांवर विश्वास ठेवत त्यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. अब्दुल कदिर शेख यांचे भारतीय जनता पार्टी चा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले एक जेष्ठ व्यक्तिमत्त्व भाजपाला मिडाल्याने आमदार किर्तीकुमार भांगडीया व भाजपा पदाधिकारी व संपूर्ण कार्यकर्त्यांनी कदिर शेख यांचे अभिनंदन केले.अब्दुल कदिर शेख हे काँगेस पक्षाचे जेष्ठ नेते होते त्यांचा चिमुर विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क दांडगा आहे ते चिमूर नगर परिषद चे नगरसेवक असून काँग्रेस पक्षाचे गटनेते होते.मात्र चिमूर नगर परिषद मध्ये सत्ता परिवर्तीत होऊन काँग्रेसची सत्ता बसलेपासून चिमूर नगर परिषद चा विकास थांबला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी नगर परिषद चिमूर ला विकास कामे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. एवढ्या मोठ्या प्रमानात विकासाच्या सपाटा सुरू असतांना नगरपरिषद मधील काँग्रेस पदाधिकारी विकास कामांना अडथळा निर्माण करायचे.अब्दुल कदिर शेख यांनी चिमूर मधे लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष टिकवून ठेवला होता मात्र त्यांच्या भाजपा पक्षात पक्ष प्रवेशाने काँग्रेस ला चिमूर विधानसभा क्षेत्रात खूप मोठा झटका पडलेला आहे.
पक्ष प्रवेशाचे वेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.देवरावजी भोंगळे,उपाध्यक्ष कृष्णा भाऊ सहारे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हटवादे,चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.दिलीपजी शिवरकर,माजी नागरध्यक्षा शिल्पाताई राचलवार,भाजपा जेष्ठ नेते राजुभाऊ देवतळे, महिला अध्यक्ष गीताताई लिंगायत,नगरसेवक सतीश जाधव,भारती गोडे ,तुषार काळे, मनीष तुंपल्लीवार व सम्पूर्ण भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.



















