सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१७.०१.२०२०
माळशिरस- नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे, पोलीस सब इन्स्पेक्टर इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल हांगे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, डॉ.बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला नातेपुते चे आरएसपी चे प्रशिक्षक काळे सर तसेच सहशिक्षक तसेच आरएसपी विद्यार्थी यांचेकडून महाराष्ट्र राज्य ३१ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२० अनुषंगाने पथसंचलन करण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेपेक्षा अति वेगात वाहन चालवू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, पादचाऱ्यांनी नेहमी फूटपाथचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये, रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन चालवू नये. अशा विविध नियमांचे बोर्ड तयार करून आरएसपीचे विद्यार्थी व पोलीस यांच्याकडून पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली.



















