पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.०१.०६.१९
शिवसेना राहटणी-श्रीनगर विभाग व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी २०% सवलीताच्या दराने विक्री केंद्राचे उद्दघाटन जेष्ट शिवसैनिक बाबा थोरात यांच्या हस्ते शिवसेना शाखा तापकीरनगर या ठिकाणी करण्यात आले.
शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या संकल्पनेतुन व शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरूवात तापकीरनगर मध्ये प्रथमच करण्यात आल्याने पालकवर्गा कौतुक केले जात आहे.
या उपक्रमाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आव्हान युवराज दाखले यांनी केले आहे.या प्रसंगी तुकाराम शिंदे,भिमराव ढवारे, अक्षय घटकार,आशिष वाळके, गोरख पाटील,नवनाथ जाधव, रवि थोरात,सचिन येडके ,सचिन घोलप,पिंटु थोरात आदी उपस्थित होते.



















